Keep Traveling

banner image

मधूक्रांती 2019 - बसवंत मधमाशी उद्यान व प्रशिक्षण केंद्र

Baswant-Honey-Bee-Park-Nashik
*मधूक्रांती 2019*
*बसवंत मधमाशी उद्यान व प्रशिक्षण केंद्र*
मधमाशी हा पृथ्वीतलावरील एक अत्यंत परोपकारी कीटक आहे. मधमाशीचा जीवनक्रम हा अत्यंत आश्चर्यकारक असून मानवजातीच्या उन्नतीसाठी मधमाशीचे कार्य खूप महत्त्वाचे आहे.
शालेय जीवनात आपल्याला मधमाशीची प्राथमिक ओळख होते. फुलांमधील रस शोषून ती मध तयार करते आणि परागीभवनात मदत करते इतकी प्राथमिक माहिती आपल्याला सुरुवातीच्या काळात मिळते. मधमाशीची आगळी वेगळी जीवनशैली, त्यांची संघटीत होऊन काम करण्याची पध्दत, राणीमाशीचे सलग दोन तीन वर्षे दररोज 1000 पेक्षा जास्त अंडी देण्याच्या अद्भूत कार्यपद्धतीमुळे एकंदरीत सर्वांनाच मधमाशीबाबत कुतूहल निर्माण होते. पुढील शिक्षणात मात्र मधमाशी गायब होते.
पुढे कृषिशास्त्राचा किंवा किटकशास्त्राचा अभ्यास करतांना काही जणांना पुन्हा एकदा मधमाशीची भेट होते. काही जणांना मधमाशी बाबत उत्सुकता निर्माण होऊन ते या क्षेत्रात काम सुरु करतात. यापेक्षा जास्त काम आजतरी महाराष्ट्रात झालेले दिसत नाही.
बऱ्याच पुस्तकांत किंवा लेखांमध्ये आपल्याला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांचा एक संदेश वाचायला मिळतो. तो संदेश असा आहे की *जर मधमाशी या पृथ्वीतलावरून संपली तर अवघी जीवसृष्टी पुढील चार वर्षांत संपुष्टात येईल*. आता पृथ्वीतलावरून मधमाशी लगेचच संपेल आणि लगेचच मानवजात संपुष्टात येईल असे होणार नसले तरी या संदेशाचा अर्थ मधमाशीच्या एकूणच अस्तित्वासाठी खूप महत्वाचा आहे.
एकंदरीतच मधमाशीचे महत्त्व सर्वांना ठाऊक असूनही मधमाशीपालनातील काही क्लिष्ट गोष्टींमुळे महाराष्ट्रात मधमाशीचा म्हणावा तसा प्रसार झालेला नाही. या संदर्भात छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही पिंपळगांव बसवंत येथे *बसवंत मधमाशी उद्यान व प्रशिक्षण केंद्र* सुरू केले. द्राक्षाच्या आगारात मधमाशी केंद्र कसे यशस्वी होईल हा अनेकांचा प्रश्न बरोबरच होता. त्यातून मार्ग काढून आम्ही या ठिकाणी हे मधमाशी प्रशिक्षण केंद्र यशस्वीपणे सुरू केले आहे.
मधमाशी या विषयावर कृषी क्षेत्रात प्रसार व्हावा या उद्देशाने *6 ते 8 डिसेंबर 2019* दरम्यान *बसवंत मधमाशी उद्यान* येथे *मधूक्रांती 2019* हे राज्यस्तरीय प्रदर्शन व परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे.
यासंदर्भातील सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
आपण या दोन दिवसीय परिसंवादात भाग घ्यावा ही विनंती. ते शक्य नसल्यास या तीन दिवसांत कधीही या प्रदर्शनास भेट द्यावी. तेही शक्य झाले नाही तर त्यानंतर तुमच्या सोयीने या ठिकाणी भेट द्यावी कारण 8 डिसेंबर नंतर हे उद्यान सर्वांसाठी खुले राहणार आहे.
फक्त मधमाशी उद्यानच नाही तर *बसवंत गार्डन* ला सुद्धा भेट देता येणार आहे. *बसवंत गार्डन* मध्ये आपल्याला आदर्श गांवाची प्रतिकृती *आदर्श गांव सेवरगांव*, *मध प्रक्रिया उद्योग*, *बेदाणा प्रक्रिया उद्योग* व *बेदाणा म्युझियम* बघायला मिळणार आहे.
आपण सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवावा ही नम्र विनंती.
*धन्यवाद* !!
आपला,
*पूर्वा परिवार*
*ठिकाण*:- *बसवंत मधमाशी उद्यान व प्रशिक्षण केंद्र.*
मुखेड रोड, पिंपळगांव बसवंत,
जिल्हा नाशिक.
*अधिक माहितीसाठी संपर्क*:-
7774089517, 9423961705,
8149516843, 9075610110
मधूक्रांती 2019 - बसवंत मधमाशी उद्यान व प्रशिक्षण केंद्र मधूक्रांती 2019 - बसवंत मधमाशी उद्यान व प्रशिक्षण केंद्र Reviewed by Baswant Raisins on November 26, 2019 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.