Keep Traveling

banner image

मधुक्रांती 2019

Madhukranti 2019 Baswant Honey Bee Park Nashik

मधुक्रांती 2019

मधमाश्यांसारखा उद्यमशील कीटक हा शेती आणि पर्यावरणातील प्रमुख घटक आहे. पीक उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी अनेक निविष्ठा आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. परंतु आजपर्यंत निसर्गाने दिलेल्या या मधमाशीचा पीक उत्पादनात वाढ होण्यासाठी जास्तीचा प्रयत्न मात्र शेतकर्यांकडून केला जात नाही. अर्थात याला तंत्रज्ञान निर्मिती आणि प्रसार करणार्या संस्था जबाबदार आहेत. मधमाशीचा फुलाला होणारा स्पर्श हा परिसासारखा असतो. मधमाशीच्या स्पर्शाने परागीभवन होऊन फळधारणा वाढते आणि सोन्यासारखे उत्पादन मिळते तेही कोणताही अतिरिक्त खर्च न करता. शेती उत्पादन वाढीबरोबरच मधमाशी मध, परागकण, प्रॉपॉलिस, रॉयल जेली, मेण आणि इतरही अनेक पदार्थांची निर्मिती करते, ज्याला मानवी आरोग्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.

मधमाशी पालनातून शेतीचे शाश्वत उत्पादन मिळविण्याबरोबरच मधमाशी पालन व्यवसाय केला तर मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होऊ शकते. शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्याबरोबरच समाजाच्या निरोगी जीवनासाठी मधमाशी पालनासारखा दुसरा कोणताही व्यवसाय नाही की, जो आजपर्यंत फारच दुर्लक्षित राहिलेला आहे. दुसर्या हरितक्रांतीची अपेक्षा ठेवली तर त्यासाठी मधुक्रांती होणे गरजेचे आहे. याच विचाराने ‘ग्रीनझोन अॅग्रोकेम प्रा.लि.’ संचलित आणि ‘पूर्वा केमटेक प्रा.लि.’ यांच्या सहकार्याने ‘बसवंत मधमाशी उद्यान आणि प्रशिक्षण केंद्रा’ची स्थापना करून याच माध्यमातून अनेक उपक्रम सुरू केले आहेत. मधमाश्यांच्या विविध जातींच्या पेट्या, मधमाश्यांसाठी आवश्यक असलेल्या पिकांची लागवड, मधमाश्यांच्या माध्यमातून विविध उत्पादन अशा या एकत्रित बाबींचे संग्रहालय सुरू केलेले आहे. या सर्व बाबींचा एकूणच उद्देश शेतकरी आणि सर्व समाजाला मधमाश्यांची उपयुक्ततता आणि महत्त्व पटवून देणे. याचाच एक भाग म्हणून आयोजित केलेला हा राज्यस्तरीय परिसंवाद आणि प्रदर्शन.


-: परिसंवादातील महत्त्वाचे विषय :-


* मधमाशीची ओळख
* राज्य, देश आणि जागतिक पातळीवर मधमाश्यांचे संवर्धन व संगोपन
* मधमाशीचे जीवनचक्र आणि कार्यप्रणाली
* शास्त्रीय पद्धतीने मधमाशी संगोपन तंत्रज्ञान
* पीक उत्पादकतर वाढीसाठी पाळीव मधमाश्यांचे महत्त्व
* मधमाशी पालनातून उद्योजकता विकास


या महत्त्वाच्या विषयाबरोबर महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर भारतातील विविध राज्यांतील यशस्वी मधमाशी पालकांचे अनुभव कथन, यशोगाथा तसेच मधमाशी पालनासाठी शासनाच्या विविध योजना या विषयांवरही या परिसंवादामध्ये चर्चा होणार आहे. मधमाशी पालनाचे अर्थशास्त्र, या उद्योगाच्या भविष्यातील संधी आणि महाराष्ट्रामध्ये या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय संघटन तयार करणे, यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच मधमाशी पालनासाठी एक व्यासपीठ तयार करणे, जेणेकरून भविष्यात महाराष्ट्रामध्ये हा व्यवसाय वृद्धिंगत व्हावा, हा या परिसंवादाचा हेतू आहे.परिसंवादामध्ये महाराष्ट्रातील सर्व भागातील शेतकरी, युवक आणि महिलांनी सहभागी व्हावे, ही अपेक्षा आहे. तसेच कृषी महाविद्यालयांबरोबरच इतर महाविद्यालयांतील विद्यार्थी तसेच शिक्षकांनीही या परिसंवादामध्ये सहभाग घ्यावा, ही अपेक्षा आहे. कारण या सर्वांच्या माध्यमातून हा महत्त्वाचा विषय पुढे घेऊन जायचा आहे.


*कृपया सर्वानी like 👍 आणि share केलं तर सर्वांपर्यंत ही उपयुक्त माहिती पोहोचेल.* https://bit.ly/36rbNPa
मधुक्रांती 2019 मधुक्रांती 2019 Reviewed by Baswant Raisins on November 02, 2019 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.