Keep Traveling

banner image

काळ्या मनुका/ बेदाणे खाण्याचे फायदे - 2020

Black Raisins Benefits in Marathi

Black Raisins Benefits in Marathi

नमस्कार,  
नाशिक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ती चवदार द्राक्षे अन् त्या द्राक्षांपासून तयार होणारा बेदाणा! बेदाणा म्हणजे सुका मेवाच्या थाळीतला महत्वाचा घटक. परंतु आपण खातो तो बेदाणा अस्सल व नैसर्गिक असेलचं असं नाही.
बाजारपेेठेतील ग्राहकांची गरज व बेदाण्यातील औषधी गुणधर्म लक्षात घेऊन ग्रीनझोन अ‍ॅग्रोकेम. प्रा.लि. नाशिक यांनी ‘बसवंत’ या नांवाने चविष्ट किशमिश / बेदाणा (सीडलेस) व मनुका (सीडेड) आपल्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. 'बसवंत' चा जंबो ब्लॅक काळा किशमिश हा अल्पावधीतच सर्व ग्राहकांच्या पसंतीला उतरला. अमेझॉन / फ्लिपकार्ट  वर सुद्धा बसवंत जंबो ब्लॅक ला प्रचंड मागणी आहे.

बेदाणा व मनुका म्हणजे काय ? 

पिकवलेली बिगरबियांची द्राक्षे नैसर्गिक सूर्यप्रकाशात विशिष्ट पद्धतीने वाळवून तयार होणारी सुकी द्राक्षे म्हणजे बेदाणा आणि बियांच्या द्राक्षापासून बनणार्‍या द्राक्षांना मनुका म्हणतात. आयुर्वेदात सुद्धा काळ्या किशमिश ला प्रचंड महत्त्व आहे.

प्रकार :- जंबो ब्लॅक किशमिश / बेदाणा ('नाशिकचा किशमिश बसवंत किशमिश ')

गुणधर्म :- मधूर, शितल, वातानुमोलक, कफ पित्तहारक, रक्तवर्धक.

समानता :- दुधाची बहुतेक सर्व गुणतत्वे उपलब्ध.

उपलब्ध घटक :-
      100 ग्रॅम बेदाणा

     77 मि.गॅ्र. लोह.,  87 मि.ग्रॅ. कॅल्शियम.,  
     2 ग्रॅम खनिजे.,  308 किलो कॅलरी उर्जा.

आरोग्याच्यादृष्टीने उपयुक्तता :-

दौर्बल्य :- अतिपरिश्रम, कुपोषण, वृद्धावस्था अथवा एखाद्या मोठ्या आजारानंतर शक्ती मिळवण्यासाठी 20 ग्रॅम काळे बेदाणे किंवा मनुके 2 तास पाण्यात भिजवून खावेत.

रक्ताल्पता :- 10-15 ग्रॅम काळे मनुके 1 कप पाण्यात भिजवून त्यात थोडासा लिंबाचा रस टाकावा व 4-5 तासांनी चावून खावेत.

बद्धकोष्ठ :- 25-30 ग्रॅम काळे बेदाणे किंवा मनुके आणि 1 अंजीर 250 मिली पाण्यात भिजत ठेवावेत. सकाळी चांगल्या प्रकारे कुस्करून गाळून या मिश्रणात अर्धा चमचा लिंबाचा रस व 2 चमचे मध मिसळून सेवन केल्यास मलावरोध दूर होतो.

आम्लपित्त :- पाण्यात काळे मनुके/ काळे बेदाणे भिजवून बनवलेले सरबत सकाळ - संध्याकाळ प्यायल्याने पित्ताचे शमन आणि मलाचे यथायोग्य विसर्जन होते.

'नाशिकचा किशमिश बसवंत किशमिश '
आमचा हा प्रयत्न आपणास निश्चित आवडेल अशी आम्ही आशा बाळगतो.
काळ्या मनुका/ बेदाणे खाण्याचे फायदे - 2020 काळ्या मनुका/ बेदाणे खाण्याचे फायदे - 2020 Reviewed by Baswant Raisins on September 07, 2019 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.