Keep Traveling

banner image

बसवंत निसर्गोत्सव - 2020

बसवंत निसर्गोत्सव - 2020

बसवंत निसर्गोत्सव - 2020

नमस्कार !
१९ ते २२ मार्च २०२० दरम्यान सिटी सेंटर मॉल, नाशिक (महाराष्ट्र) येथे द्राक्षे आणि बेदाणा (किशमिश) यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विविध प्रकारचे द्राक्ष जसे रेड ग्लोब, क्रिमसन, फ्लेम सीडलेस, व्हाईट ब्युटी, ब्लॅक ब्युटी, इटालियन व्हाईट, थॉम्पसन सीडलेस, फॅन्टसी, मँगो, जंबो ब्लॅक, शरद सीडलेस, सोनाका, नानासाहेब पर्पल इ. विविध प्रकार बघण्यास मिळतील.
तसेच येथे बेदाणा / किशमिश / मनुका यांचे अनेक प्रकार या प्रदर्शनात असतील. बसवंत जंबो ब्लॅक सीडलेस बेदाणा, ग्रीन बेदाणा, पिवळा बेदाणा, लॉंग सोनाका बेदाणा, सीडेड अफगान बेदाणा, सिराज वाईन बेदाणा अशा अनेक जाती प्रदर्शनात व विक्रीसाठी उपलब्ध असतील.
नाशिक शहर हे फुलांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे याच अनुषंगाने या प्रदर्शनात “जानोरी फ्लॉवर्स” या ब्रँड ने गुलाब तसेच जरबेरा या फुलांचे विविध प्रकार प्रदर्शनात बघण्यास मिळणार आहेत.
विशेष आकर्षण :
चला, नाशिकला बनवूया मधमाश्याचं शहर ! 🐝
फुलांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिकला आता बनवूया मधमाश्याचं शहर... 🐝
बसवंत मधमाशी प्रशिक्षण केंद्र व उद्यान आपल्यासाठी घेऊन येत आहे “मधमाशी पालन व त्यावर आधारित प्रदर्शन”
शहरी भागातील मधमाशी पालन, मधमाश्यांचा जीवनक्रम पट, विविध प्रकारचे मध, विविध प्रकारच्या मधपेट्या व मधमाशी पालनाचे साहित्य आदी गोष्टी बघावयास मिळतील. तसेच विविध प्रकारचे मध चाखण्यासाठी तसेच विक्रीसाठी उपलब्ध.
कृपया आपण आपल्या सर्व कुटुंब आणि मित्रांसह उपस्थित राहून आनंद घ्यावा. आपणांस आग्रहाचे निमंत्रण. 🙏
#nashik #grapes #grapefestival #nashikcity #nashikkar #flowers #flower #event #exhibition #grapecity #raisins #kishmish #baswant #honey #honeybee #beehive #bees #beehives #travel #tourism #urbanbeekeeping #savethebees #beekeeping #beekeeper #family #friends #nasikcity #honeybeecity #janoriflowers #apiary #honeybeepark #beegarden #citycentermall #ccm #ccmnashik #citycentermallnashik #minashikkar
बसवंत निसर्गोत्सव - 2020 बसवंत निसर्गोत्सव - 2020 Reviewed by Baswant Raisins on March 04, 2020 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.